सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (16:07 IST)

येत्या 21 सप्टेंबरला मनसेचा 'रेल्वे प्रवास' आंदोलन

मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल लवकर सुरु करा, अशी मागणी विशेषतः उपनगरात राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या 21 सप्टेंबरला जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे. मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी यांनी याबाबतची माहिती दिली. 
 
सर्वसामान्य जनतेला कामावर जाताना त्रास सहन करावा लागतो. बसमध्ये गेलं तरी गर्दी, रस्त्यावरुन गेलं तरी गर्दी, हा गर्दीचा त्रास जर वाचवायचा असेल तर रेल्वे प्रवास हा सुरु करावा. पण घरात बसून जे सरकार चालवत आहेत, त्यांना याची काहीच काळजी नाही. त्यासाठी आम्ही मनसेतर्फे 21 सप्टेंबरला आम्ही रेल्वेने प्रवास करणार आहोत. जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास,” असे संतोष धुरी म्हणाले.