सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शनिवार, 7 मे 2022 (21:40 IST)

भोंग्यांवरुन मुंबई पोलिस आक्रमक; 2 मशिदींवर गुन्हा दाखल

mumbai police
राज्यात गाजत असलेल्या भोंग्यांच्या वादावर सध्या मुंबई पोलिस आक्रमक झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि राज्य सरकारने काढलेल्या विविध आदेशांचे पालन न करणाऱ्या मुंबईतील दोन मशिदींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात वांद्रे येथील नुरानी मशिद आणि सांताक्रूझच्या लिंकरोडवरील कब्रस्तान मशिदीचा समावेश आहे.
 
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालय आणि राज्याच्या गृह विभागाने काढलेल्या आदेशांनुसार, रात्री10 ते सकाळी 6 या काळात भोंग्यांना परवानगी नाही. त्यानंतरच्या काळातही विशिष्ट आवाजातच भोंग्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, निश्चित केलेल्या आवाजाच्या नियमांचे पालन न केल्यानंच या दोन्ही मशिदीच्या ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मशिदींच्या भोंग्यांवरुन सकाळी नमाज अदा करण्यात आली. पोलिसांनी नोटिस बजावूनही त्याचे उल्लंघन करीत सकाळी ६च्या आधी भोंग्यांचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. शिवाय दुपारची अजानही मोठ्या आवाजात देण्यात आली. याची दखल घेतच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.