बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (08:03 IST)

हा शुभसंकेत, घटस्थापनेच्या दिवशी रुग्णालयात नऊ मुलींचा जन्म

घटस्थापनेच्या दिवशीच मुंबईतील कल्याणमधील वैष्णवी रुग्णालयात एकाच दिवशी नऊ मुलींचा जन्म झाला. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. एकाच दिवशी तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची अनोखी घटना घडली आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मिळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडेच चर्चा होत आहे
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड योद्धा आरोग्य कर्मचारी युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. कल्याणच्या वैष्णवी रुग्णालयातही अशाच प्रकारे यंत्रणा राबत होती. मात्र, घटनस्थापनेच्या दिवशी आलेल्या या शुभसंकेताने सर्व कोविड योद्ध्यांमध्ये एकच उत्साह संचारला. रूग्णालयात ११ गर्भवती महिला दाखल झाल्या होत्या. त्यातील ९ महिलांनी मुलींना जन्म दिला तर दोन महिलांनी मुलांना जन्म दिला. 
 
आपल्या रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत असताना खुद्द नवदुर्गांनीच अवतार घेतल्याची भावना साऱ्यांनी व्यक्त केली आहे. कल्याणच्या सुप्रसिध्द डॉ. अश्विन कक्कर यांची सामाजिक आणि संवदेनशील व्यक्ती म्हणून सर्वत्र ओळखतात.