सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 9 ऑगस्ट 2021 (15:41 IST)

पोलीस कुटुंबीयांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबईतील दादरमधील नायगाव येथील पोलीस वसाहत धोकादायक असल्याने घरं खाली करण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत.पोलीस वसाहत धोकादायक असल्याने या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.यानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांकडून आक्रोश व्यक्त केला जात असून विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्या भेटी घेतल्या आहेत.दरम्यान पोलिसांचे कुटुंबीय आज याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले होते.राज ठाकरेंनी यावेळी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना चिंता करु नका सांगत आपण याचा पाठपुरावा करु असं आश्वासन दिलं.
 
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही विरोध केला असून वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण पोलिसांच्या कुटुंबीयांना बेघर होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.