सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 21 जानेवारी 2022 (08:25 IST)

रेमो डिसुझाच्या मेव्हण्याने पंख्याला गळफास घेऊन केली आत्महत्या

कोरिओग्राफर रेमो डिसुझाच्या मेव्हण्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली  आहे. जेसन सॅवियो वॅटकिन्स (48) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
जेसन सॅवियो वॅटकिन्स हा मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील यमुना नगर येथील फ्लॅट क्रमांक 302 मध्ये राहत होता. सकाळी त्याने खोलीतील पंख्याला गळफास घेत जीवन संपवले. जेसनने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. दुपारी 12 वाजता मुख्य नियंत्रण कक्षाला अंधेरी यमुना नगरमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसनला खाली उतरवले आणि कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी जेसनचे 74 वर्षीय वडील डेसमंड सिरिल डन्स्टन आणि बहीण लिझी रेमो डिसूझा यांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे