मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑगस्ट 2022 (15:06 IST)

राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली

sanjay raut
खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती.त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं.
 
पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ईडीने या प्रकरणी मंगळवारी दोन ठिकाणी शोध मोहीम राबवली होती. रोख रकमेच्या व्यवहारांबाबत पुरावे गोळा करण्यासाठी ही शोध मोहीम राबवली होती. लवकरच या प्रकरणाशी संबंधित काही व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे.