गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (21:30 IST)

चला, सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊ या, पूजा करू या

मुंबईच्या लाडक्या सिद्धिविनायक गणपतीचे घरबसल्या दर्शन घेता येणार आहे. सिद्धिविनायक ट्रस्टने ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच आपण सिद्धिविनायक गणपतीची पूजाही करता येणार आहे. मात्र यासाठी वेळ घ्यावा लागणार आहे. त्यासाठी सिद्धिविनायक गपणती अॅपचा वापर करायचा  आहे.
 
हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर दररोज गणपतीचे दर्शन घेता येऊ शकते, अशी सुविधा करण्यात आली आहे. तसेच सिद्धिविनायकाची पूजाही करु शकता. हे अॅप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले.  
 
श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाची आरती करण्यात आली.या क्षणांचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाला सुरेख अशा चाफ्याच्या सुवासिक फुलांचा साज चढवल्याचं पाहायला मिळला. चाफ्याची कंठी आणि विलोभनीय असं गणरायाचं रुप  सगळ्यांना पाहता आले.