रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2020 (17:10 IST)

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या करुन या दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आले. दरम्यान ही हत्या कोणत्या कारणामुळे घडली हे अद्याप समोर आलेले नाही.
 
या घटनेत, मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली. नरेश पंडित (52) आणि हरेश शेट्टी (48) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही बारचे कर्मचारी होते.
 
या बारच्या मालकाने गुरुवारी रात्री 10.30 वा. याबाबतची माहिती मीरारोड पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता त्या दोघांचे मृतदेह टाकीत आढळून आले. तसेच या दोन्ही मृतदेहांच्या डोके आणि शरीरावर जखमा आढळल्या. दरम्यान मीरा रोड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.