शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (08:31 IST)

आज पुन्हा लसीकरण मोहिम सुरु मात्र काही ठिकाणी लसीकरणाला स्थगिती

कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिम अंतर्गत उपलब्ध लस साठ्याची मर्यादा लक्षात घेता आणि मोहिमेतील प्राधान्य लक्षात ठेवून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून लसीकरणाचे दैनंदिन नियोजन करण्यात येत आहे. दिनांक १४ ते १६ मे २०२१ या कालावधीत तसेच १७ मे २०२१ रोजी तौत्के चक्रीवादळाच्या प्रभावाची शक्यता लक्षात घेता लसीकरण स्थगित करण्यात आले होते.
 
आज मंगळवार दिनांक १८ मे २०२१ आणि बुधवार, दिनांक १९ मे २०२१ रोजी मुंबईत लसीकरण सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.
 
अ) वादळासह पावसाने प्रभावित झालेली काही लसीकरण केंद्रे आज बंद राहणार आहेत.
 
ब) कोविशिल्ड लस देताना, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनांनुसार, कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेनंतर किमान १२ ते १६ आठवडे (किमान ८४ दिवस) पूर्ण केलेल्यांनाच दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. त्यामुळे ६० वर्ष वयोगटातील नागरिक दिनांक २४ मे २०२१ नंतर दुसऱ्या मात्रेसाठी पात्र राहतील. याअनुषंगाने दिनांक १८ मे २०२१ आणि दिनांक १९ मे २०२१ या दोन्ही दिवशी कोविशिल्डच्या पहिल्या मात्रेसाठी ६० वर्ष व त्यावरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर थेट (वॉक इन) जाऊन लस घेता येईल. लसीकरण मोहिमेच्या नियोजनास मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.