मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: भिवंडी , गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (09:48 IST)

कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम जोरात

महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी लस टोचावी लागल्याने अनेकांना आश्चर्यही वाटलं. मात्र, या लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात भागही घेतला.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागला तसे सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच महाविद्यालय शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याने भिवंडीत स्वयं सिद्धी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे या महाविद्यालयात मोफत लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी रांगेशिवाय लस मिळत असल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
 
ठाण्यातही लसीकरण
कोरोनाच्या संख्येत घट झाल्या नंतर तब्बल दीड वर्षानंतर महाविद्यालय सुरू झाली आहेत. सर्व विद्यार्थ्यांची स्क्रिनिंग, तापमान तपासणी, मास्क, सॅनिटाझर आणि दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. विद्यार्त्यांकडून अंडर टेकिंग फॉर्म देखील भरून घेतले जात आहेत. शिवाय वर्गात 50 टक्के क्षमतेने विद्यार्थी बसवण्यात आले आहे. तसेच काही ठाण्यात काही महाविद्यालयात तर थेट विद्यार्थ्यांना लस टोचली जात आहे.
 
टप्प्या टप्प्यानं कॉलेज सुरु करा: सामंत
जरी महाविद्यालयांना नियोजन करण्यासाठी किंवा महाविद्यालये सुरू करण्यासाठी वेळ मिळाला नसला तरी त्यांनी टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करावे. आज आरोग्य विभाग संचालिका अर्चना पाटील यांच्यासोबत सुद्धा एक बैठक आहे. यामध्ये कॅम्पस मध्ये लसीकरण कशा प्रकारे करावे याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. जेणेकरून कॅम्पस मध्येच विद्यार्थ्यांना पहिला डोस दुसरा डोस देता येतील. ही मोठी मोहीम आम्ही पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहोत, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.