शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (12:55 IST)

Virar :सेल्फीच्या नादात एकाच कुटुंबातील चौघी पाण्यात पडल्या, दोघींचा दुर्देवी मृत्यू

सध्या सेल्फी काढण्याचं वेड लहानांपासून मोठ्यानं लागलं आहे. सध्या कुठेही गेल्यावर तरुण तरुणी सेल्फी काढतातच. मग ते पिकनिकस्पॉट असो किंवा इतर कुठे ही असो. सेल्फीच्या नादात अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागते. तरीही सेल्फीचा नाद काही कमी होत नाही.पालघर तालुक्यात वैतरणा नदीवर जेटी पट्टा भागात सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या त्यापैकी दोघींना वाचविण्यात यश आले असून दोघी पाण्यात बुडाल्या आहे.या चौघींमध्ये तीन सख्य्या बहिणी असून चवथी त्यांची वाहिनी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम येथे वैतरणा जेट्टी भागात फणसवपाडा गावात राहणाऱ्या दासना कुटुंबातील तिघी बहिणी आपल्या वाहिनीसह शनिवारी संध्याकाळी नदीकाठी फिरायला गेल्या असता. नदीच्या पाण्यात सेल्फी काढण्याचा मोह त्यांना आवारात आला नाही आणि सेल्फी काढताना तोल जाऊन त्या चौघी पाण्यात पडल्या आणि बुडू लागल्या. त्यांना पाण्यात पडताना पाहून त्या परिसरात असलेल्या स्थानिकांनी दोरखंड टाकून त्याना बाहेर काढले. मात्र दोघी पाण्यात बुडाल्या. नीला धमसिंह दासना(24)आणि संतू दासना(14) असे मृत्युमुखी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलांच्या जवानांनी शोधकार्य सुरु केले. मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. 
 Edited By - Priya Dixit