रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 26 जानेवारी 2022 (17:49 IST)

प्रजासत्ताक दिना निमित्त महिलांसाठी निर्भया पथकाची भेट

मुंबईतील महिलांवरील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित बनवण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिलांना निर्भया पथकाची भेट दिली आहे. हे पथक  सदैव महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात असेल. 
 
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे आणि अनेक खासदार आणि इतर मंत्री मुंबईतील आयुक्तांच्या मुख्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. याशिवाय बॉलिवूड चित्रपट निर्माता रोहित शेट्टीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
 
आदित्य ठाकरे म्हणाले , असे प्रयत्न ठेवावेत, यामुळे मुंबईत राहणाऱ्या महिलांना अधिक सुरक्षिततेची भावना येईल आणि त्यांना अधिक सुरक्षित वाटेल
 
महाराष्ट्र महिलांच्या सुरक्षेत नंबर-1 असेल
राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी जनतेला शुभेच्छा देतो, असेच काम करत राहा आणि गौरव मिळवत राहा, महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत मग ते पोलीस असो किंवा राजकारण. एखादी गोष्ट घडली की लोक त्या विषयावर चर्चा करतात आणि त्यानंतर शांत होतात, मात्र निर्भया पथक आता प्रत्येक महिलेच्या सुरक्षेसाठी तैनात असेल.हे पथक महिलांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे.
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी रोहित शेट्टी आणि रिलायन्सचे आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. मी इतकंच म्हणेन की आता चुकीच्या मार्गाने किंवा तिला त्रास देणार्‍यांचे भले होणार नाही. महिला सुरक्षेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल.
 
मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नागरे पाटील यांनी या निर्भया पथकाविषयी सविस्तर माहिती देताना सांगितले की, हा पथक मुंबईतील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहे आणि कोणत्याही कॉलला त्वरित अटेंड करून महिलेला मदत करण्यास सज्ज असेल. या विभागात एक महिला अधिकारी, 2 महिला हवालदार आणि 2 पुरुष हवालदार एक टीम म्हणून काम करतील.
 
त्यांनी सांगितले की, आम्ही या विभागातील लोकांना प्रशिक्षणासाठी हैदराबादला पाठवले होते, तेथे त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासोबतच अशा परिस्थितीत पीडितेला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षणही मानसोपचार तज्ज्ञांकडून घेण्यात आले आहे. यासोबतच आम्ही डीकॉय ही संकल्पनाही स्वीकारली असून, याअंतर्गत आमच्या महिला पोलीस गर्दीच्या ठिकाणी सामान्य महिलांप्रमाणे राहतील आणि कोणी छेडछाड करणारे दिसल्यास त्यांच्याकडून त्वरितच कारवाई केली जाईल.
 
या स्वतंत्र पथकाला रिलायन्सकडून 100 आयफोन देण्यात आले असून, यामध्ये तीन वर्षांसाठी इंटरनेटही देण्यात आले आहे, हा फोन या स्वतंत्र पथकाकडे असेल जेणे करून कोणत्याही महिलेला गरजेला मदत मिळू शकेल.