मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 1 जुलै 2023 (07:25 IST)

मुंबईत 1 जुलैपासून दैनंदिन पाणीपुरवठ्यात पाणीकपात

water tap
Water cut मुंबईत 1 जुलैपासून दैनंदिन पाणीपुरवठ्यात 10 टक्के पाणीकपात लागू करण्याची घोषणा केली आहे. परिणामी, उद्यापासून मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागेल.
 
जोपर्यंत तलावांत समाधानकारक पाऊस पडून पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ होत नाही तोपर्यंत ही पाणीकपात सुरूच राहणार आहे. तसेच, मुंबई महापालिकेकडून ठाणे, भिवंडी, निजामपूर या पालिका क्षेत्रातही काही प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने तेथेही सदर पाणीपुरवठयात 10 टक्के पाणीकपात लागू असणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना जोपर्यंत 10 टक्के पाणीकपात लागू राहील तोपर्यंत जपून पाणी वापर करावा लागणार आहे. मात्र पावसाने निराशाजनक कामगिरी केल्यास पाणीकपातीमध्ये पुढील काळात आणखीन वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
मुंबईत 24 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. 28 जून रोजी तलावांत एकूण 1 लाख 5 हजार 109 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. सदर पाणीसाठा पुढील २७ दिवसच म्हणजे पुढील 24 जुलैपर्यंत पुरेल इतकाच होता. त्यातच मुंबई व ठाणे जिल्हा परिसरातही अपेक्षित पाऊस पडून तलावातील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ होत नसल्याने पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मुंबईत 1 जुलैपासून दैनंदिन पाणीपुरवठयात 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची घोषणा 28 जून रोजी केली होती. मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. तर वर्षभरासाठी मुंबईला 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता असते.