मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (16:50 IST)

वरळी हिट अँड रन प्रकरण: आरोपीची पोलिसांकडून चौकशी अपघाताच्या वेळी स्वतः कार चालवण्याची कबुली

mihir shah
वरळी येथे हिट अँड रन प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. फरार होण्यापूर्वी त्याने आपली ओळख लपवण्यासाठी त्याने दाढी मुंडवली असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने अपघाताच्या वेळी स्वतः कार चालवण्याची कबुली दिली आहे. आरोपीने सांगितले अपघातानंतर तो खूप घाबरून गेला आणि त्याचे वडील घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी तो पसार झाला.
 
पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कुटुंबापासून दूर का गेला. याचा तपास पोलीस करत आहे. 

आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस पुढील तपासासाठी आरोपीची कोठडी मागणार आहे. 
आरोपीने आपल्या बीएमडब्ल्यूने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला उडवले होते. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी पळून गेला.

तो परदेशात पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली. मात्र, घटनेच्या 72 तासांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अपघाताच्या वेळी तो कार चालवत होता, असे आरोपीने कबूल केले आहे. 
 
Edited by - Priya Dixit