शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दहशतवादाच्या बीमोडासाठी पाककडून आणखी प्रयत्न हवेत

नवी दिल्ली- स्वत:च भूमीतील दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी पाककडून आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तानमधील शांतता आणि स्थिरता अबाधीत राखून त्यांच्याबरोबर सौदार्हपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे असतील तर पाकिस्तानने त्यांच्या भूमीतील दहशतवादी अड्डय़ांचा समूळ नायनाट करणे आवश्क आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे. 
 
जॉन केरी सध्या तीन दिवसाच्या भारत भेटीवर आले आहेत. ते म्हणाले की, हक्कानी नेटवर्क आणि लष्कर-ए-तोयबा या सारख्या दहशतवादी संघटनांच्या विरोधात कडक कारवाई करणे आवश्यक असल्याबाबत आपण पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यंच्याशी चर्चा केली आहे.