मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दहशतवादी हल्ल्यात आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद

चंदेल (मणिपूर)- मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आसाम रायङ्खल्सचे सहा जवान शहीद झाले आहेत. हेंगशी आणि तुइयांग गावादरम्यान झालेल्या भूस्खलनचा जवान व अधिकारी आढावा घेत असताना दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.
 
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एकच्या सुमारास दहशतवादी आणि आसाम रायफल्स यांच्यात झालेल्या चकमकीत सहा जवानांना वीरमरण आले. या हल्ल्यात ज्युनिअर कमांडिंग ऑफिसर (जेसीओ) सह पाच ‘29 आसाम रायफल्स’ जवानांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी हा नियोजित केलेला हल्ला असून दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जवानांकडील ‘एके 47’ रायफल्स, एक इंसास रायफल्स, एक एलएमजी रायफल्स आणि दारुगोळा पळवला आहे. हे दहशतवादी कॉरकॉम दहशतवादी संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी टिटरवरुन दु:ख व्यक्त केले. चंदेली जिल्ह्यात याच परिसरात गेल्यावर्षी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते.