शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

यूपीएससीमध्ये देशात टीना दाबी प्रथम

नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून दिल्लीच्या टीना दाबी या विद्यार्थिनीने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
 
जम्मू-काश्मीरच्या अमीर अल शरी खान अख्तर याने दुसरा क्रमांक तर दिल्लीच्या जस्मितसिंग संधू याने तिसरा क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्रातील योगेश कुंभेजकरने राज्यात पहिल्या येण्याचा मान पटकावला आहे. देशपातळीवर कुंभेजकर आठव्या स्थानावर आहे
 
देशातून जम्मू-काश्मीरच्या अथर आमीर उल शफी खानने दुसरं स्थान पटकवलं आहे, तर दिल्लीचा जसमीत सिंग संधू तिसर्‍या क्रमांकावर आहे.
 
डिसेंबर 2015 मध्ये झालेली लेखी परीक्षा आणि मार्च-मे 2016 दरम्यान घेण्यात आलेल्या वैयक्तिक मुलाखतींनंतर गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये आयएएस, आयएफएस, आयपीएस आणि केंद्रीय सेवांसाठी 1 हजार 78 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.