शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पावसासाठी लावलं होतं बेडकाच लग्न, आता थांबवण्यासाठी घटस्फोट

भोपाळ- मध्य प्रदेशात जोरदार पावसामुळे लोकं हैराण होत आहे. तुफान पावसामुळे सर्वाधिक प्रभावित राजधानी भोपाळमध्ये मागील 4 दिवसांपासून संततधार थांबण्याच नावाच नाहीये. येथे सामान्यापेक्षा दीडपट पावसाची नोंद झालेली आहे. एक जून ते आतापर्यंत भोपाळमध्ये 61 इंच याहून अधिक रेकॉर्ड पाऊस पडला आहे.
 
पावसामुळे लोकं आपल्या घरांमध्ये कैद झाले असून सामान्य जीवन प्रभावित होत आहे. शहरातील सर्वात मोठं कोलार धरणाहून पाणी सोडण्यामुळे येथील अनेक भागात पुरा सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना सुरक्षित जागी हालवण्यात येत आहे.
 
बेडकाचा घटस्फोट 
पावसामुळे त्रस्त्र नागरिकांनी पाऊस थांबवण्यासाठी नवीन टोटका केला आहे. भोपाळमध्ये जुलै महिन्यात पावसाचे संकेत दिसत नव्हते तेव्हा येथील एका संस्थेने बेडकाच लग्न लावला होतं म्हणून आता पाऊस थांबवण्यासाठी त्याच बेडकाचा घटस्फोट करण्यात आला आहे.
 
सामाजिक संस्था ओम शिव शक्ती सेवा मंडळाचे सचिव रिंकू भटेजा यांच्याप्रमाणे भोपाळसह प्रदेशात चांगला पाऊस पडावा म्हणून संस्थेतर्फे 19 जुलै रोजी विधिपूर्वक बेडकांचे लग्न संपन्न केले होते पण आता जेव्हा अतिवृष्टीमुळे लोकं हैराण होत आहे तर पाऊस थांबवण्यासाठी बेडकांना विसर्जित केले गेले आहे. माती निर्मित बेडकांना लग्नानंतर मंदिरात ठेवले होते नंतर वेगळं करून त्यांना विसर्जित करण्यापूर्वी मंदिरात पूजा- अर्चना केली गेली.