पहिल्याच दिवशी कर्नाटकात तब्बल ४५ कोटींची मद्य विक्री
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात काही नियम शिथिल केले गेलेत. त्यानुसार कंटेन्मेंट झोन वगळता कर्नाटकमध्ये राज्य सरकारने मद्य विक्रीची परवानगी दिली.
कर्नाटकमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत दारू दुकानं खुली करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानुसार आज पहिल्याच दिवशी तब्बल ४५ कोटींची मद्य विक्री झाली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलीय.
बेंगळुरूमध्ये दारू दुकानं उघडण्यापूर्वीच त्यांच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. बेंगळुरूतील अनेक दुकानांबाहेर मोठी गर्दी उसळली होती. दुकानाबाहेर लांबलचक रांग झाल्याने बेंगळुरूच्या दक्षिण भागात पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी तर पाण्याचा मारा करावा लागला.