रविवार, 5 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (11:09 IST)

बंगाल : दुर्गा विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरात 8 जण बुडाले

WB flood
पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा विसर्जनाच्या वेळी दुर्घटना घडली. येथे अचानक आलेल्या पुरात 8 लोकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर 30- 40 लोकांना वाचविण्यात यश मिळाले आहे.
 
बुधवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या जलपैगुडी भागात ही घटना घडल्याची माहिती आहे.
 
माल नदीच्या काठावर शेकडो लोक मूर्ती विसर्जनासाठी एकत्र जमले होते. तेव्हा पाऊस येणार असा कोणताही अंदाज नसताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे ही दुर्घटना घडली. सिक्कीमच्या उंच भागात अचानक पाऊस पडल्याने ही घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.