गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

उत्तर भारतात तुफानामुळे 79 लोकांची मृत्यू, 100 हून अधिक जखमी

उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथील लोकं उष्णतेमुळे त्रस्त आहे तर बुधवारी रात्री आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे या राज्यांमध्ये जवळपास 79 लोकांची मृत्यू झाली असून जखमी लोकांचा आकडा 100 हून अधिक पोहचला आहे.
 
उत्तर प्रदेशात बुधवारी रात्री वादळामुळे किमान 50 लोकांची मृत्यू झाली आणि 38 जण जखमी झाले. प्रदेशाचे राहत आयुक्त संजय कुमार यांच्याप्रमाणे आग्रा येथे 36 लोकांची मृत्यू झाली. तसेच जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 150 हून अधिक जनावरांची मृत्यू झाली आहे. भयावह तुफानामुळे अनेक घर पडली व विजेचे खांबदेखील ध्वस्त झाले. 
 
यूपी च्या आग्रा येथे 36 लोकांची मृत्यू
राजस्थानमध्ये 12 मृत्यू भरतपूरमध्ये
राजस्थानमध्ये मृतकांच्या नातेवाइकांना चार लाखांची नुकसानभरपाई
मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यात 2 लोकांची मृत्यू
वार्‍याचं वेग 120 किमी प्रति तास
या दरम्यान अनेक झाड आणि विजेचे खांब पडले