शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 मार्च 2018 (15:35 IST)

छत्तीसगड : नक्षलवाद्यांचा आयईडी स्फोट, ८ जवान शहीद

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात ८ जवान शहीद झाले. या स्फोटात सहा जवान जखमी झाले असून यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. सुकमा जिल्ह्यातील किस्तराम परिसरातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २१२ व्या बटालयनचे जवान जात होते. यादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवला. 

केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात सीआरपीएफच्या 212 बटालियनवर नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजित कट रचून हल्ला केला.सीआरपीएफचे जवान किसतराम जंगलात गस्त आणि शोधमोहिम राबवत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी सुरुंग पेरुन ठेवले होते. नक्षल्यांनी त्या सुरुंगाचा शक्तीशाली स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर गोळीबार केला. या जंगलात जवळपास दीडशे नक्षलवादी दबा धरुन बसले होते. त्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला.