बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 16 एप्रिल 2023 (16:11 IST)

कुत्र्यांच्या टोळीने तरुणावर केला हल्ला,तरुणाचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठात फिरणाऱ्या एका तरुणाला कॅम्पसमध्ये 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी चावा घेत जखमी केले,त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सफदर अली असे मृताचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कुत्रा चावल्याची ही संपूर्ण घटना AMU कॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, सिव्हिल लाइनमध्ये राहणारा सफदर अली रविवारी सकाळी 7.30 वाजता एएमयू कॅम्पसमध्ये फिरत असताना 10 ते 12 कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.कुत्र्यांनी त्याला इतके चावले की सफदरचा काही वेळातच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी सफदर एकटाच होता. त्याला मदत करणारे आजूबाजूला कोणी नव्हते. काही वेळाने सफदरला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
 
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर त्यांनी जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सफदरचा मृत्यू कुत्रा चावल्याने झाल्याचे समजले. सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जाईल.
Edited By - Priya Dixit