गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:53 IST)

गोव्यात मोफत वीजेबरोबरच सर्वधर्मियांसाठी मोफत तीर्थयात्रांचे 'आप'चे आश्वासन

गोव्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं मोठी आश्वासनं आणि घोषणा केल्या आहेत. गोव्यामध्ये मोफत वीजेबरोबरच सर्वधर्मियांसाठी मोफत तीर्थयात्रांचं आयोजन करण्याचं आश्वासन केजरीवालांनी दिलं आहे.
 
गोव्यामध्ये आपची सत्ता आली तर, सरकारच्या माध्यमातून सर्व धर्मियांसाठी मोफत तीर्थयात्रेचं आयोजन केलं जाईल. हिंदुंसाठी अयोध्या, ख्रिश्चनांसाठी वेलनकन्नी तर मुस्लिम बांधवांसाठी अजमेर शरीफ आणि साई भक्तांसाठी शिर्डी येथील दर्शनासाठी मोफत यात्रा आयोजित करण्याचं आश्वासन केजरीवालांनी दिलंय.
केजरीवाल यांनी गोव्यात प्रत्येक कुटुंबाला महिन्यात 300 युनिट वीज मोफत देण्याचं आश्वासन आधीच दिलं आहे. तसंच 24 तास वीज आणि शेतकऱ्यांना मोफत वीज अशी आश्वासनंही त्यांनी दिलेली आहेत.