बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (13:10 IST)

Accident: कार अपघातात 5 पोलिसांचा मृत्यू

accident
राजस्थानच्या नागौरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागौरमध्ये पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 पोलिस गंभीर जखमी झाले. कारमध्ये 8 पोलीस होते. सर्व पोलीस कर्मचारी मोदींच्या निवडणूक रॅलीसाठी जात होते. पंतप्रधान सभेसाठी पोलिसांची ड्युटी लागल्याने नागौर जिल्हयातील खिवसर ठाण्याचे पोलीस कर्मचारी एकाच वाहनातून एकत्र निघाले असता अपघात झाला. 
 
राजस्थानच्या झुंझुनूमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवडणूक रॅली साठी होणाऱ्या सभेत  हे पोलीस तैनात होते पण वाटेत नागौर जिल्ह्यातील कनुता गावाजवळ त्यांच्या गाडीला ट्रकची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात 5 पोलिसांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. 
 




Edited by - Priya Dixit