रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (18:10 IST)

हवाई दलाचे MI-17 हेलिकॉप्टर कोसळले, दोन्ही पायलट सुरक्षित

इटानगर. अरुणाचल प्रदेशात गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये 2 पायलट आणि 3 क्रू मेंबर्ससह 5 लोक होते. सर्व 5 जण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेलिकॉप्टर बऱ्याच दिवसांपासून वापरात नसल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी पायलटने उड्डाण घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते कोसळले. अपघाताच्या चौकशीचे आदेश लवकरच जारी केले जातील.
 
उल्लेखनीय आहे की 2017 मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये MI-17-V5 हेलिकॉप्टर कोसळले होते. या  अपघातात 7 जवान शहीद झाले.