रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

धमकी! मला मत न देणार्‍यांना रडवलं नाही तर माझं नाव अर्चना चिटणीस नाही

मध्य प्रदेशामध्ये बुरहानपुरहून काँग्रेसच्या बागी उमेदवार ठाकुर सुरेंद्र सिंग यांनी वरिष्ठ भाजप मंत्री अर्चना चिटणीस यांना मात दिली. अर्चना चिटणीस पराभवाची वेदना सहन करू शकल्या नाही आणि जनतेवर भडकल्या. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
 
जनतेचे आभार घेण्यासाठी घेतलेल्या सभेत त्यांनी केलेल्या भाष्यामुळे उपस्थित लोक थक्क झाले. अर्चना यांनी म्हटले की ज्यांनी माझ्या आणि माझ्या पक्षाविरोधात काम केले आहे ते लोकं रात्री झोपू शकणार नाही. ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांची मान खाली जाणार नाही. मात्र, ज्या लोकांनी चुकून किंवा बाहेरच्या लोकांचे ऐकून तसेच भीतीने मला मतदान केले नाही, त्यांना रडवलं नाही तर माझं नाव अर्चना चिटणीस लावणार नाही आणि त्यांना आता चांगलाच पश्चात्ताप होईल.
 
अर्चना चिटणीस या ठाकुर सुरेंद्र सिंग यांच्याकडून 5120 मतांनी पराभूत झाल्यात. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चिटणीस यांच्या खाजगी सहाय्यकांनी यावर सफाई देत म्हटले की त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे.