शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (12:24 IST)

अरविंद केजरीवाल यांची राजीनामाची घोषणा, अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यावर आता समाज सेवक अण्णा हजारेंची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, मी अरविंद केजरीवाल यांना राजकारणात येऊ नका असे सांगितले होते. समाजाची सेवा करा.मोठे व्हाल.

आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो त्यावेळी मी त्यांना राजकारणात येऊ नका असे सांगितले होते. आज जे व्हायचे होते ते झाले. त्यांच्या मनात काय आहे हे मला कसे कळेल. उशिराने सुचलेलं शहाणपण आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यावर केजरीवाल यांनी रविवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. अरविंद केजरीवाल म्हणाले, 'दोन दिवसांनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी त्या खुर्चीवर बसणार नाही. दिल्लीत निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहेत. मला विधी न्यायालयातून न्याय मिळाला, आता जनतेच्या न्यायालयातून न्याय मिळणे अपेक्षित आहे. जनतेनी आदेश दिल्यावरच मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसेन.

दिल्लीसाठी नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी येत्या दोन दिवसांत आप आमदारांची बैठक होणार असल्याचे ते म्हणाले.महाराष्ट्रातील निवडणुकांसोबतच दिल्लीत फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्याची  मागणीही केजरीवाल यांनी केली आहे.
Edited by - Priya Dixit