शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (15:32 IST)

औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच सरकारकडून मंजुरी : श्रीपाद नाईक

पतंजली आयुर्वेद लिमिटेडने करोना व्हायरसवर बनवलेल्या औषधाचे सर्व रिपोर्ट तपासल्यानंतरच सरकारकडून मंजुरी देण्यात येईल असे आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. यासाठीच ‘आयुष’मंत्रालयाने पतंजलीकडे या औषधातील घटकांचा तपशील मागितला आहे असे त्यांनी सांगितले.   
 
“बाबा रामदेव यांनी देशाला एक नवीन औषध दिले ही एक चांगली बाब आहे. पण नियमानुसार त्यांनी सर्वप्रथम आयुष मंत्रालयाकडे यायला पाहिजे होते”असे श्रीपाद नाईक  म्हणाले. ‘पतंजलीने मंत्रालयाला रिपोर्ट पाठवला आहे. आम्ही तो रिपोर्ट तपासल्यानंतरच परवानगी देऊ’असे नाईक यांनी सांगितले.