गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (20:53 IST)

बाप रे !एयर इंडियाच्या विमानात वटवाघूळ

नवी दिल्ली :एअर इंडिया चे विमान दिल्लीहून अमेरिकेत उड्डाण करत असताना त्यात वटवाघूळ आढळल्याने विमानाची आपत्कालीन लँडिंग करावी लागली. शुक्रवारी पहाटे 2.20 वाजता एअर इंडियाचे उड्डाण क्रमांक AI -105 ने दिल्लीहून नेवार्क (न्यू जर्सी) कडे उड्डाण केले. टेक-ऑफनंतर सुमारे 30 मिनिटांनंतर प्रवाशांच्या क्षेत्रात म्हणजे केबिन मध्ये वटवाघुळ दिसला .त्यानंतर विमान परत दिल्लीला आणण्यात आले, तिथे विमानाची आपत्कालीन लँडिंग पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना  मृतावस्थेत असलेला वटवाघूळ काढला.
 
एअर इंडियाच्या बोईंग 777-ER विमानाचा वापर दिल्ली ते नेवार्क दरम्यान उड्डाण सेवांसाठी केला जातो. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “दिल्ली-EWR AI -105 विमानासाठी दिल्ली विमानतळावर स्थानिक स्टँडबाय आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानाच्या लँडिंगच्या वेळी क्रूने केबिन मध्ये वटवाघूळ असल्याची माहिती दिली.
 
वन्यजीव तज्ज्ञांनी वटवाघूळ काढले-
शुक्रवारी उड्डाणानंतर सुमारे अर्धा तास नंतर वैमानिकाने विमानातील वटवाघूळ विषयी हवाई वाहतूक नियंत्रणास माहिती दिली. यानंतर आपत्कालीन घोषणा करून विमान परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानतळावरील कर्मचार्‍यांनी लँडिंगनंतर विमानाचा शोध घेतला असता त्यातील वटवाघूळ कोठेही सापडले नाहीत. यानंतर वन्यजीव तज्ञांना बोलविण्यात आले. त्यांनी विमानात फ्युमिगेट (धूर) केले, नंतर ते वटवाघूळ आढळले.तो पर्यन्त ते वटवाघूळ मेलेले होते.
 
डीजीसीएने घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर नागरी उड्डाण महासंचालक (डीजीसीए) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  सांगितले की, “एअर इंडियाचे B 777-300ER विमान दिल्ली-नेवार्क दरम्यानच्या सेवेसाठी वापरले जाते. त्याचा नोंदणी क्रमांक VT -ALM आहे. ' या प्रकरणात ग्राऊंड सर्व्हिस कर्मचार्‍यांचे दुर्लक्षही उघडकीस आले आहे, कारण प्रत्येक उड्डाणांपूर्वी विमानाची कसून तपासणी केली जाते. जेव्हा सर्व काही व्यवस्थित असतं तेव्हाच त्यास फ्लाइटसाठी परवानगी मिळते.
 
बी-777 ER मध्ये 344 प्रवासी प्रवास करू शकतात,
दिल्ली ते न्यू जर्सीकडे जाणाऱ्या  एअर इंडिया विमानात जाणाऱ्या एकूण प्रवाशांची माहिती मिळाली नाही, परंतु सेवेसाठी वापरलेले बी-777ER  विमानात 344 प्रवासी प्रवास करू शकतात.अशा परिस्थितीत उड्डाण करणाऱ्या या विमानात वटवाघुळाच्या उपस्थितीने प्रवाशांसह चालक दल यांच्या जीवनाला धोका निर्माण झाला असता.
 
अभियांत्रिकी सेवा म्हणाली- कॅटरिंग वाहनातून येण्याची शक्यता
विमानात वटवाघूळ आढळणाऱ्याच्या घटनेच्या बाबत एअर इंडियाच्या अभियांत्रिकी सेवेने एका प्राथमिक अहवालात म्हटले आहे की, कॅटरिंग वाहने यासाठी जबाबदार असू शकतात.आंतरराष्ट्रीय उड्डाणे विमान प्रवाशांना अन्न देतात. हे भोजन बेस किचनमधून येते आणि विमानात भरले जाते. यापूर्वीही अशा वाहनांमध्ये उंदीर आणि इतर लहान प्राणी आढळले आहेत.