शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (19:44 IST)

Bangalore : कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले करोडो रुपये

असं म्हणतात की देव देतो तर छप्पर फाडून देतो. असं काहीसं घडलं आहे. बेंगळुरू मध्ये  32 वर्षीय कचरा वेचणाऱ्या सुलेमान शेख सोबत. सुलेमान शेख याला प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या पिशवीत US$3 दशलक्ष म्हणजे 30 लाख अमेरिकी डॉलर सापडल्याने धक्काच बसला. याशिवाय त्यावर इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी बांधलेली आढळून आली. 3 नोव्हेंबर रोजी सकाळी नागावराजवळ राहणाऱ्या शेख यांना नागावरा स्टेशनवर रेल्वे रुळांजवळ एका बॅगेत अमेरिकन डॉलरचे बंडल सापडल्याची घटना घडली. शेख याने हे पैसे रविवारी पोलिसांच्या स्वाधीन केले. 

सुलेमान हे पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात राहणारे असून बेंगळुरू मध्ये कचरा वेचण्याचे काम करतात. 1 नोव्हेंबर रोजी कचरा वेचताना त्यांना नागवारा रेल्वेस्थानकावर त्यांची नजर एका काळ्या पिशवीवर पडली त्यांनी पिशवी उघडल्यावर त्यात पैसे आढळले. त्याने कोणाला काहीच सांगितले नाही. मात्र 5 नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या मालकाला हे सर्व सांगितले नंतर ते पैसे दाखवले.

एवढे पैसे पाहून त्यांनी सामाजिक कार्यकर्ते कलीम उल्लाह  यांच्याशी संपर्क साधला. 5 नोव्हेंबर रोजी उल्लाह हे सुलेमान ला घेऊन  शहर पोलीस आयुक्त कार्यालयात गेले आणि यूएस डॉलर्सचे बंडल पोलीस बी दयानंद यांना दिले
 
अधिक तपासात या सर्व नोटा बनावट असल्याचे समोर आले असून त्या अधिक माहिती गोळा करण्यासाठी चेन्नईतील दुसऱ्या एका खासगी बँकेत पाठवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी सांगितले की, “आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की त्या बनावट नोटा आहेत, परंतु त्यांनी तसे करण्यास अधिकृत नसल्याचे सांगत अहवाल देण्यास नकार दिला. आम्ही बंडल चेन्नईतील एका खाजगी बँकेकडे पाठवले आहेत, जी अशा प्रकरणांमध्ये आमची नोडल एजन्सी आहे.”








Edited by - Priya Dixit