बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (16:13 IST)

4 हात आणि 4 पाय असलेल्या मुलाचा जन्म; लोक देवाचा अवतार मानत आहेत, डॉक्टर काय म्हणाले ?

बिहारमधील कटिहार जिल्ह्यात चार हात आणि चार पाय असलेल्या मुलाचा जन्म झाला, तेव्हा लोक याला दैवी चमत्कार मानत आहेत. लोक मुलाला देवाचा अवतार असे वर्णन करत आहे. कटिहार सदर रुग्णालयात एका महिलेने एका अद्भूत मुलाला जन्म दिला होता. मुलाचे एक डोके, चार हात आणि चार पाय होते. या अद्भुत मुलाच्या जन्मानंतर कोणी त्याला निसर्गाचा करिष्मा सांगत आहेत तर कोणी त्याला देवाचा अवतार म्हणत आहेत. त्याचवेळी या बालकाला पाहण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी झाली होती.
 
मुलाच्या जन्मानंतर नर्स आणि डॉक्टरांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे. अनुराधा कुमारी यांचे मूल हे सामान्य नसून अद्वितीय मूल असल्याची माहिती परिचारिकांनी कुटुंबीयांना दिली. या अद्भुत मुलाच्या जन्माची बातमी संपूर्ण रुग्णालयात आगीसारखी पसरली. हे पाहून लोकांची गर्दी जमली आणि लोक याला निसर्गाचा करिष्मा मानू लागले.
 
येथे खासगी क्लिनिकमध्ये तीन ते चार वेळा अल्ट्रासाऊंड करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कदाचित त्यामुळे मुलावर परिणाम झाला असावा. मात्र, बाळ सुखरूप असल्याची ग्वाही डॉक्टरांनी दिली. मात्र मुलाला चार पाय, चार हात असल्याने ही बाब संपूर्ण परिसरात कुतूहलाचा विषय बनली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाळ निरोगी आहे. बाळाच्या जन्मानंतर त्याला पाहण्यासाठी अनेक लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहेत.
 
हफलागंजमधील महिला प्रसूती वेदनांनंतर कटिहार सदर रुग्णालयात पोहोचली होती, जिथे तिने एका अद्भूत मुलाला जन्म दिला. दुसरीकडे सदर हॉस्पिटलचे डॉक्टर शशी किरण सांगतात की यात अद्भूत, आश्चर्य किंवा देवी करिश्मा असे काहीही नाही. असे वैद्यकीय शास्त्रात यापूर्वी अनेकदा घडले आहे.