सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 23 जानेवारी 2020 (14:23 IST)

मुस्लिमांना विचारून काँग्रेस सरकार चालवते : भाजप

काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने टीकास्त्र सोडले आहे. चव्हाण यांच्या वक्तव्याने काँग्रेसची पोलखोल झाली असून, तंनी हिंदूंचा अपमान केला आहे. काँग्रेस मुस्लिमांना विचारून सरकार चालवते, असे भाजप नेते संबित पात्रा यांनी म्हटले.
 
महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांच्या आग्रहामुळे काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी नुकतेच केले होते. यावरून भाजपने काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसची पोलखोल झाली आहे असे सांगून भाजप नेते संबित पात्रा यांनी काँग्रेसचा मुस्लीम लीग काँग्रेस असा उल्लेख केला. चव्हाण यांनी हिंदूंचा अपमान केला आहे, असेही ते म्हणाले.