1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (15:04 IST)

बकरीच्या पोटी माणसासारखं पिल्लू, पाहण्यासाठी गर्दी जमली

goat
मध्य प्रदेशात सिरोंज येथील सेमलखेडी गावात एका शेळीने विकृत पिल्लूला जन्म दिला आहे. या कोकराचे तोंड माणसासारखे दिसतं आहे. हा विचित्र दिसणारा कोकरू पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक जमत आहे. 
 
तोंडाच्या वेगळ्या प्रकारामुळे शेळीसुद्धा या कोकराला दूध देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कोकरूला सिरिंजने दूध पाजले जात आहे.
 नवाब खानच्या या बकरीच्या पिल्लाचा चेहरा चष्मा घातलेल्या म्हाताऱ्यासारखा दिसतो. डॉक्टरांप्रमाणे अशा विचित्र कोकरांचे आयुष्य कमी असतं. 
 
सेमलखेडी येथील नबाब खान हे शेतकरी आहेत. त्याच्याकडे एक म्हैस आणि सात शेळ्या आहेत. या शेळीने प्रथमच कोकर्याला जन्म दिला आहे. 
 
पशुवैद्यांप्रमाणे वैद्यकीय भाषेत याला हेड डिस्पेप्सिया म्हणतात. हा प्रकार 50 हजारांपैकी 1 मध्ये घडतो. अशी प्रकरणे बहुतेक गाई-म्हशींमध्ये दिसतात. हा कोकरू जास्त काळ जगणार नाही कारण अशी बहुतेक पिल्ले फक्त 1 आठवडा ते 15 दिवस जगतात.