शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

... आणि रावणालाच भरावा लागला दंड

mukesh rishi
देशात आज कुठे रावणाची पूजा करतात तर कुठे सीतेचे अपहरण केलेल्या रावणाचे दहन केले जाते. या प्रकाराचे अनेक कार्यक्रम आज देशभर साजरे केले जातात. दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या रामलीला कार्यक्रमामध्ये रावणाची भूमिका साकार करणार्‍या अभिनेत्यालाच लाल किल्ल्यावर जात असताना हेल्मट नसल्याने वाहतूक पोलिसांकडून दंड ठोठवण्यात आला आहे. 
 
रावणाची भूमिका करणार्‍या मुकेश ऋषी यांचा रावणाच्या वेशभूषेत दुचाकी चालवतानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी नोटीस पाठवून दंड ठोठवण्यात आला आहे.
 
रामायणातील रावण पुष्पक विमानातून जात होते तर आधुनिक रावणाची भूमिका करणारे मुकेश ऋषी इंडिया गेटजवळून हार्ले डेविडसनवरून फेरफटका मारत होते. यावेळी येथील नागरिकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे सांगत वाहतूक पोलिसांकडून आ‍धुनिक रावण बनलेल्या मुकेश ऋषी यांना हेल्मेट वापरले नसल्याचा कारणावरून दंड भरण्यास लावला आहे.