रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 जानेवारी 2019 (09:39 IST)

शाळेत पंखा लावण्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पालघरच्या  सफाळे-वेढी येथील गणेश लोहार या नववीतील विद्यार्थ्याला शाळेत पंखा लावण्याच्या कारणावरून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात केळवे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय आगरवाडी येथे हा प्रकार घडला.  
 
सकाळी वर्ग भरल्यानंतर महेश राऊत या शिक्षकाने वर्गात पंखा कुणी लावला, याचा जाब विचारला. सरांचा चढलेला पारा पाहता, एकही विद्यार्थी पुढे आला नाही. अनेक वेळा विचारूनही कुणी उत्तर देत नसल्याने, संतप्त झालेल्या राऊत यांनी लाइट बोर्डाच्या खाली बसलेल्या गणेशला समोर बोलावले. त्याला याबाबत जाब विचारल्यानंतर पंखा लावला नसल्याचे सांगूनही शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा उजवा डोळा सुजून पूर्ण लाल-काळा पडला. संध्याकाळी कामावरून घरी परतलेल्या आईवडिलांनी त्याला सुजलेल्या डोळ्याबाबत विचारले, पण त्याने उत्तर दिले नाही. त्यानंतर आठवडाभर तो शाळेत गेला नसल्यामुळे काही मित्र त्याला पाहायला घरी गेले. त्यावेळी सदरची हकिकत कळली.