सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (10:58 IST)

देशात 5 ठिकाणी भूकंप

आज सकाळी राजस्थानच्या बीकानेर मध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर भूकंपाचे प्रमाण 5.3 होते.
 
राजस्थानच्या बीकानेर मध्ये भूकंपाचे हे धक्के पहाटे 5:24 वाजता जाणवले. भूकंपामुळे मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.या पूर्वी आदल्या रात्री मेघालयात देखील भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.1 एवढी होती.
 
त्याच वेळी लेह लडाख येथे पहाटे 4:57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.रिश्टर स्केल वर त्याची तीव्रता 3.6 होती.तर हरियाणाच्या सोनपत मध्ये देखील रात्री च्या सुमारास एका पाठोपाठ एक असे दोन भूकंपाचे धक्के जाणवले.रिश्टर स्केल वर त्यांची तीव्रता 2.3 आणि 2.1 अशी नोंदली गेली.