शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 जानेवारी 2019 (09:03 IST)

असे वापर कर EVM मशीन सोबत VVPAT या मशीन

राज्य निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमे अंतर्गत राज्यभरात व्हीव्हीपीएटी मतदान यंत्रणेचे प्रशिक्षण दिले जात आहे. आगामी निवडणुकांना समोर ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार जनाजागॄती मोहिम चालू आहे. याचाच भाग म्हणूण आज लातूर शहर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये हा स्टॉल लावण्यात आला होता. काही दिवसांपुर्वी ०५ राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यात VVPAT मशीनचा वापर करण्यात आला. आता येणार्‍या निवडणुकांमध्येही EVM मशीन सोबत VVPAT या मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे मतदारांचा गोंधळ उडू नये यासाठी ही प्रात्यक्षिके करून दाखवण्यात येत आहेत. मतदाराने मतदान केल्यानंतर VVPAT मशीनमध्ये ७ सेकंदासाठी आपण टाकलेले मतदान त्याच उमेदवारस गेले आहे की नाही हे पाहता येईल. यामुळे EMV मशीनबातत जे असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले होते त्यास आता आळा बसेल असे सांगण्यात आले. मतदार आपल्या मताची पुन्हा पडताळणी करू शकणार आहेत. या मोहिमेची सुरुवात लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केली आहे. प्रत्येक तहसील कार्यालयातून प्रशिक्षित कर्मचार्‍यांमार्फत याबाबतची जनजागॄती करण्यात येते आहे.