रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 17 डिसेंबर 2019 (14:34 IST)

केंद्राच्या राज्यांना सूचना : फेक न्यूज आणि सोशल मीडियांवरील अफवा रोखा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आसामपासून देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. देशातील नागरिकांची सुरक्षा आणि रक्षा महत्त्वाची असल्याने हिंसक आंदोलनाला आळा घाला. तसेच फेक न्यूज आणि सोशल मीडिावरील अफवा त्वरित रोखा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत.
 
राज्यांमद्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यासाठी पावले उचला. तसेच सोशल मीडिावरील अफवा आणि फेक न्यूज रोखण्यासाठी कायद्यानुसार कारवाई करा, अशा सूचना केंद्रीय  गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत. सोशल मीडिावरील अफवांमुळेच राज्यांमध्ये आंदोलने सुरू असल्याचेही केंद्राचे म्हणणे आहे. काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसानही करण्यात आले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी राज्यांनी तातडीने उपायोजना कराव्यात, असेही केंद्राने म्हटले आहे.
 
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आसाम, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही हे आंदोलन सुरू झाले आहे. तर दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठिचार्जच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठातही निदर्शने करणत आली असून राज्याच्या अनेक भागात या आंदोलनाचे लोण पसरत आहे.