शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (09:31 IST)

शेतकऱ्यांच 28 तारखेला मुंबईत महापंचायत, तर 29 ला संसदेला घेराव

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला येत्या 26 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत.
या निमित्ताने शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या 28 नोव्हेंबरला मुंबईत महापंचायतीचे आयोजन करण्यात आलं आहे. तसंच 29 नोव्हेंबरला संसदेला घेराव घालण्याचं नियोजनही करण्यात आलं आहे.
 
26 नोव्हेंबरला पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एकत्रित जमणार आहेत.
 
या सर्वांची एकत्रित बैठक होणार असून 28 नोव्हेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांची महापंचायत होणार आहे, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिली.