गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (13:06 IST)

JK: वानपोरामध्ये पाच किलो IED जप्त, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा कट उधळून लावला

जम्मू-काश्मीरमधील शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी वानपोरा येथील नेवा शृंगार रोड येथून पाच किलो आयईडी जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कुंडीत आयईडी पेरण्यात आला होता. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आयईडी निकामी केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
वानपोरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर पुलवामा पोलीस, 50-RR आणि CRPF (183 बटालियन) यांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान आयईडी जप्त करून दहशतवाद्यांचा मोठा कट टळला.