शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (13:37 IST)

Ghaziabad: दिल्लीतील तरुणीवर निर्भयाप्रमाणे सामूहिक बलात्कार,दिल्ली महिला आयोगाने प्रकरणाची दखल घेतली

rape
दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. गाझियाबादच्या नंदग्राम परिसरात एका महिलेचे कारमधून पाच जणांनी अपहरण करून तिच्यावर दोन दिवस सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडही घातला. आश्रम रोडजवळ महिलेला बेशुद्ध अवस्थेत फेकून आरोपींनी पळ काढला. 
 
सदर महिला दिल्लीतील नंदनगरी भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती नंदग्राम परिसरात भावाच्या घरी आली होती. परतत असताना काही लोकांनी तिला पळवले . 

महिलेला अंतर्गत जखमा नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पीडित 36 वर्षीय महिलेला 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.15 वाजता जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेच्या उपचारासाठी तज्ज्ञांचे पथक तैनात करण्यात आले आहे. 
 
याबाबतची माहिती यूपी 112 वरून पोलिसांना मिळाली. महिलेला दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
चौकशीत आरोपींची या महिलेशी आधीच ओळख असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणात दाखल घेत गाझियाबाद पोलिसांना नोटीस बजावली आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून दावा केला की, दिल्लीची मुलगी गाझियाबादहून रात्री परतत असताना तिला बळजबरीने कारमध्ये नेण्यात आले. पाच जणांनी दोन दिवस सामूहिक बलात्कार केला. तिच्या गुप्तांगात रॉड घातला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या गोणीत ती सापडली तेव्हा रॉड तिच्या आतच होता. रुग्णालयात ती जीवनाशी लढत आहे. एसएसपी गाझियाबाद यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

दिल्लीतील तरुणी गाझियाबादहून रात्री परतत असताना तिला बळजबरीने कारमध्ये नेण्यात आले. 5 जणांनी 2 दिवस बलात्कार केला आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला.पीडित महिला रस्त्याच्या कडेला एका गोणीत सापडली तेव्हाही तो रॉड आतच होता. हॉस्पिटलमध्ये आयुष्याची लढाई लढत आहे.गाझियाबादच्या SSP ला नोटीस बजावली आहे.
 
SSP म्हणाले, आरोपी महिलेच्या ओळखीचे आहेत.पाच आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एफआयआर नोंदवण्यात आली आहे. चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यात मालमत्तेचा वाद असल्याचे बोलले जात आहे. ही बाब विचाराधीन आहे. आम्ही सर्व आवश्यक कार्यवाही करत आहोत.
 
Edited By- Priya Dixit