शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (10:10 IST)

चांगली बातमी ! आता रेशनच्या दुकानावर मिळणार LPG सिलेंडर, केंद्र सरकारची विशेष योजना

नवी दिल्ली. आपण लहान एलपीजी सिलिंडर वापरत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आपल्याला एलपीजी छोटू गॅस सिलेंडरची(LPG chotu gas cylinder)  चिंता करावी लागणार नाही.  लवकरच आपल्याला रेशन दुकानातून गॅस सिलिंडर खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकार किराणाच्या दुकानांतून लहान एलपीजी सिलिंडर विकण्याचा आणि आर्थिक सेवा देण्याचा विचार करत आहे.
 
एका मीडिया रिपोर्टनुसार, सरकारी रेशन दुकाने अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी अलीकडेच विविध राज्य सरकारांच्या अधिकार्‍यांसह एक वर्चूव्हल बैठक घेतली,या बैठकीत हे प्रस्ताव ठेवण्यात आले.
 
पेट्रोलियम कंपन्यांसोबतची बैठक -या बैठकीत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, वित्त मंत्रालय आणि पेट्रोलियम आणि नेचरल गॅस  मंत्रालयाचे अधिकारीही सहभागी झाले होते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), तसेच CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CSC) चे अधिकारी देखील या बैठकीत उपस्थित होते.
 
ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या प्रतिनिधींनी (OMCs) सरकारी रेशन दुकानांमधून लहान एलपीजी सिलिंडरच्या किरकोळ विक्रीच्या प्रस्तावाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या प्रस्तावावर इच्छुक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या वतीने या प्रकल्पासाठी आवश्यक मदत दिली जाईल.
 
सरकारमान्य रेशन दुकानांतून आर्थिक सेवांच्या प्रस्ताव,डिपार्टमेंट ऑफ फाइनेंशियल सर्विसेज (DFS) प्रतिनिधी की आवश्यक ती मदत स्वारस्य राज्यांमध्ये समन्वय प्रदान करण्यात येणार आहे. या रेशन दुकानांमधून मुद्रा कर्ज देण्याचाही शासन विचार करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 
बैठकीत केंद्रीय अन्न सचिव पांडे यांनी रेशन दुकाने अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यावर भर दिला. कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) च्या मदतीने या दुकानांची आर्थिक उपयुक्तता वाढवता येईल, असे राज्य सरकारांनी सुचवले.