गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (12:18 IST)

Gujrat Fire : गुजरातमध्ये पोलीस स्टेशन परिसरात अग्नितांडव, 25 गाड्या जळून खाक

गुजरातमध्ये खेडा शहरातील पोलीस स्टेशन परिसरात रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अग्निकांडात 25 वाहने जाळून खाक झाल्याचे वृत्त मिळाले आहे.या वाहनांमध्ये दुचाकी ऑटोरिक्षा आणि कार हे वाहने जाळून खाक झाले आहे. ही आग रात्रीच्या सुमारास लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. अग्निकांडानंतर परिसरात प्रचंड धूर आणि आगीचे लोट दूरवर येत होते. 
आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी  दाखल झाले आणि त्यांनी आगीवर अथक परिश्रमानंतर नियंत्रण मिळवले. या अग्निकांडात आग झपाट्याने वाढत गेली आणि त्यात वाहनांनी पेट घेतलं आणि पाहता पाहता हे वाहने आगीत जळून खाक झाले. सुदैवाने या भीषण अग्निकांडात कोणती ही जीवित हानी झालेली नाही.