बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (18:54 IST)

हरियाणा: मेवात येथे भीषण अपघात, माती कोसळून ४ मुलींचा मृत्यू

हरियाणातील मेवात येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे माती कोसळल्याने चार मुलींचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तावडूच्या कांगरका गावात हा भीषण अपघात झाला. घटनेनंतर घटनास्थळी एकच राडा झाला. लोकांची गर्दी जमली. मुली माती आणण्यासाठी गेल्या असताना ही घटना घडली. 
 
प्रत्यक्षात सोमवारी सायंकाळी वकिला (19), जानिस्ता (18), तस्लिमा (10) गुलाफशा (9), सोफिया (9) या गावातील पंचायतीच्या जागेवरून माती गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर अचानक माती खचल्याने हा अपघात झाला. यामध्ये चार मुलींचा मृत्यू झाला. तर एका तरुणीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
घटनेनंतर घटनास्थळी घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच मुलीचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. अपघातादरम्यान मातीत गाडलेल्या मुलींना बाहेर काढण्यात आले.
 
पोलिसांनी 4 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या भीषण अपघातानंतर गावात शांतता पसरली होती. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.