गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भारतात येथे तयार होतेय जगातील सर्वात उंच शिव मूर्ती

गुजरातच्या नर्मदाकाठी स्टॅचू ऑफ युनिटीचं लोकापर्ण झाल्यानंतर आता राजस्थानच्या नाथद्वारा येथे देवतांचे देव शिव यांची अद्भूत मूर्ती तयार करण्यात येत आहे. ही जगातील सर्वात उंच शिव मूर्ती असणार आहे. चला जाणून घ्या काय खास आहे यात...
 
या मूर्तीची उंची 351 फूट असणार आहे आणि पुढील वर्षी मार्चपर्यंत मूर्ती तयार होण्याची शक्यता आखली गेली आहे. उदयपूरहून 50 किमी लांबीवर नाथद्वाराच्या गणेश टेकरीमध्ये सिमेंट कंक्रीटने तयार होणार्‍या या मूर्तीचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहेत.
 
या व्यतिरिक्त सर्वात उंच शिव मूर्ती नेपाळ येथील कैलाशनाथ मंदिर (143 फूट), कर्नाटक येथे मुरुदेश्वर मंदिर (123 फूट), तामिळनाडू येथील आदियोग मंदिर (112 फूट), आणि मॉरिशस येथे मंगल महादेव (108 फूट) स्थापित केलेल्या आहेत.
 
जगातील सर्वात उंच शिव मूर्ती असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या या मूर्तीचे मार्च 2019 मध्ये अनावरण करण्यात येण्याची शक्यता आहे. 
 
जगातील सर्वात उंच शिव मूर्ती मिराज ग्रुप तयार करत आहे. भव्य शिव मूर्ती तयार करण्यासाठी 3000 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. या मूर्तीचे वजन अंदाजे 30 हजार टन असेल. शिवच्या हातातील त्रिशूल 315 फूट उंच आहे. मुर्तीमध्ये चार लिफ्ट असून 280 फुटापर्यंत पर्यटक जाऊ शकतील अशी सोय करण्यात आली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी 750 कारागीर दररोज काम करत आहे. 
 
मूर्ती 20 किमी लांबीवर स्थित कांकरोली फ्लायओव्हरहून देखील दिसेल. इतक्या लांबून रात्री देखील मूर्ती दिसावी यासाठी विशेष लाइट्स लावण्यात येत आहे. लाइट्स अमेरिकेहून मागवण्यात आली असून ऑस्ट्रेलियन कंपनीकडून हवेचा वेग आणि दिशा जाणून घेण्यासाठी तकनीकी माहिती घेतली गेली आहे.