गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2019 (12:07 IST)

बायको आणि तीन मुलांची हत्या करून पळाला, नंतर व्हिडिओत म्हणाला, मी करतोय आत्महत्या

गाझियाबाद- इंदिरापुरमच्या ज्ञानखंड येथे एका इंजिनियरने आपल्या पत्नी आणि तीन मुलांची गळा घोटून हत्या केली. रात्री तीन वाजेच्या सुमारास तो बॅग घेऊन पळून गेला. नंतर रविवारी रात्री फॅमेलीच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ अपलोड केला की मी आत्महत्या करतोय. कुटुंबातील लोकांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी गेट तोडून शव बाहेर काढले. पोलिस आरोपीला शोधत आहे.
 
ज्ञानखंड चारच्या एसएस-175 बी मध्ये सुमित कुमार पत्नी अंशूबाला (32) आणि मुलं प्रथिमेष (5), आकृती (4) आणि आरव (4) सोबत राहत होते. मुलगी आकृती आणि मुलगा आरव दोघे जुळे होते. मोठा मुलगा रिवेरा पब्लिक स्कूलमध्ये पहिली वर्गात शिकत होता. अंशूबाला एका खाजगी शाळेत शिक्षिका होती. सुमित बंगलूरू स्थित अमेरिकेच्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून पदस्थ होता. जानेवारीत त्याची नोकरी सुटली आणि यामुळे घरात वाद घडत होते. शनिवारी रात्री त्याने आपल्या पत्नी आणि तिन्ही मुलांची हत्या केली आणि बॅग घेऊन घरातून बाहेर पडला. रविवार आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुप वर व्हिडिओ टाकत सांगितले की मी आत्महत्या करतोय. नंतर त्यांच्या कुटुंबातील लोकांनी सुनेच्या घरी माहिती दिली आणि त्याचे घरी पोहचले. मेन गेटला कुलूप होते.
 
सूचना मिळाल्यावर पोलिसांनी तेथे पोहचून फ्लॅटचे कुलूप तोडले आणि आत गेल्यावर बघितले तर ड्राइंग रूममध्ये रक्ताने माखलेल्या प्रथिमेषचे शव पडले होते. पत्नी अंशूबाला बेडरूममध्ये जमिनीवर पडली होती. दोघं जुळ्या मुलांचे शव देखील बेडवर पडलेले होते. चौघांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निशाण होते. हत्येसाठी वापरण्यात आलेला मोठा चाकू देखील जप्त करण्यात आला आहे. माहितीनुसार कुटुंब मूळ रुपाने जमशेदपूर येथील होता. प्रथम दृष्टया हे आर्थिक त्रासामुळे उचललेले पाऊल असावे. व्हिडिओची तपासणी केली जात आहे. सध्या तरी आरोपी गायब आहे.