भारतातील नोटा विषाणू बाधित-इंटरनॅशनल जर्नल ऑफ डेंटल क्लिनिक
इंटरनॅशनल जर्नल ऑफ डेंटल क्लिनिकचा धक्का दायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या नुसार भारतातील नोटा विषाणू बाधित असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. फूड सेफ्टी अॅण्ड स्टँटर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने हा दावा केला आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डेंटल क्लिनिकने भारतात 5, 10, 50 आणि 100च्या नोटा गोळा केल्या आहेत. या नोटा त्यांनी भाजी मार्केट, दूध डेअरी, बँक, पेट्रोल पंप अशा ठिकाणांवरुन जमा केल्या आहेत. या नोटांवर जेव्हा रिसर्च करण्यात आले त्यावेळेस धक्का दायक निकाल समजले की, या सर्वच्या सर्व नोटा विषाणूंनी बाधित होत्या. या नोटांवर भयानक असे ई कोलाई, स्टेफाइलोकोकस, स्लमोनेला एंट्रीटाइडिस, स्ट्रेप्टोफोकस, प्रोटियस असे पाच प्रकारचे विषाणू आढळले आहे. या भयानक विषाणूंमुळे प्रतिकारक क्षमता कमी होते.
FSSAIने नोटांमुळे आजारी पडण्याचा केलेला दावा खरा आहे. या बाधित नोटा लोकांच्या संपर्कात आल्याने गंभीर आजार होत आहेत असे सिद्ध केले आहे. या विषाणूंचा सर्वात जास्त धोका लहान मुलं, महिला आणि वृद्धांना होतो. हा धोका टाळण्यासाठी खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांनी स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. तसेच हातमोज्यांचा वापरही अनिवार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नोटा घेताल तर चुकून हात न धुता तोंडात बोट टाकू नका नका. खराब नोट घेतना काळजी घ्या ज्यामुळे अनेक आजारांना टाळता येणार आहे.