बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (12:47 IST)

इंटीरियर डिझायनर तरुणीने 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली,तरुणी तणावाखाली होती

ग्रेटर नोएडा. एका इंटिरियर डिझायनर तरुण मुली(20)ने शनिवारी सकाळी ग्रेनो वेस्टमधील लॉ रेसिडेन्स सोसायटीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मुलीच्या मित्राचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती तणावाखाली होती.
 
प्रभारी बिसरख कोतवाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे नाव सैंगी  असे आहे. मुलीच्या कुटुंबीयांना घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. मात्र, खोडा येथे राहणाऱ्या मुलीच्या मित्राचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले. तेव्हापासून ती तणावाखाली होती. कुटुंबीयांनीही पाच दिवसापासून ती तणावाखाली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे मुलीने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.