सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (16:19 IST)

केजरीवाल यांची प्रकृती बिघडली, कोरोना टेस्ट होणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना ताप आणि खोकला येत असल्याने त्यांची आता कोरोना टेस्ट होणार आहे. त्यांच्या सर्व नियोजीत बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी कोणाचीच भेट देखील घेतलेली नाही. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे.
 
दिल्लीतील करोना स्थितीची माहिती देण्यासाठी केजरीवालांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर केजरीवालांची तब्येत बिघडली. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री स्वत: क्वारंटाइन आहेत अशी माहिती केजरीवाल सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी दिली.